मला बर वाटत नाही / mla br vatat nahi

Started by Vijaysawdekar, May 05, 2020, 10:20:53 AM

Previous topic - Next topic

Vijaysawdekar

      ...मला बर वाटत नाही...

माझ्या मनातलं तुला बोलणं तुला सांगणं
मला बर वाटत नाही,
सांगितलंय मी कित्तेक वेळा
तुला ते खर वाटत नाही. ।।धृ।।

मनातलं ओळखतांना बघितलंय
मी कित्येकांना
माझ्या वागण्यावरून तुझ्या
ते लक्षातही येत नाही ।।1।।

तुझ्या नजरेचे इशारे
ओळखल्या बरेचदा मी
तुला साधे माझे चेहऱ्यावरचे
भावही कळत नाही ।।2।।

हिम्मत करून सांगितलंय
बरेच दा मी
परत सांगण्या इतपत
ते सोपेही वाटत नाही ।।3।।

साधा उदास दिसलो की
लोक हाल विचारतात मला
मी अख्खच बदललोय
तुला तेवधही दिसत नाही।।4।।

संगीतलेले कळणार नाही तुला,
एबढे ते अवघडही वाटत नाही
आणि तेवढी तू नादानही
वाटत नाही..... ।।5।।

                कवी: प्रणित हि. भोजने