कोणी येतं प्रपोज करतं

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, May 07, 2020, 10:00:50 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.कोणी येतं प्रपोज करतं*

प्रपोज केला कोणी
दोष कोणावर आला
जो म्हणाला आपला
आता तोच परका झाला

प्रेम करणं अवघड झालं
प्रेमाच्या घाट वळणावर
कुणी येतं प्रपोज करत
अन कोण नेतं सरणावर

उगाच का त्रास व्हावा
आपलं आपलं म्हणतांना
काळजावर घाव होतो
डोळ्यात असावे भरतांना

शब्द शब्द वेचले जातात
काव्यरुपी या पुस्तकावर
कोणी येतं नशीब लिहून जातं
चुकून कोणत्या मस्तकावर

शेवट प्रेमाचा असा होतो
कधीचं कोणाला कळला नाही
आत्ता पर्यंत हेच खरं झालं
प्रेमात कोणता प्रेमी जळला नाही

✍🏻(कविराज.अमोल मीरा दशरथ शिंदे)
मो.९६३७०४०९००.अहमदनगर