वरदान कि शाप

Started by smadye, May 08, 2020, 11:10:36 PM

Previous topic - Next topic

smadye

वरदान कि शाप

रोज मागतो देवाला दे उन्नती आणि शांती मनाला
थोडा वेळ मिळू दे मुलासोबत घालवायला
हिच्याकडे बघायला फुरसत नसते
डोक्यावर कामाचे पुरे ओझे असते

प्रदूषणाने जीव जाम आहे वैतागला
ट्रॅफिकने मी आहे फार कंटाळलेला
कधी मिळेल उसंत
कधी घेईन श्वास निवांत

सगळे माझे छंद इतिहास जमा झाले
पुस्तकावर धुळीचे दुहेरी कव्हर चढले
रंग सगळे सुकूनि गेले ब्रश कडक झाले
व्हायलिनचे सूर कुठे हरवून गेले

रोजच्या धकाधकीचं ताण आहे वाढला
कधी मिळेल उसंत देवा सांग जरा एकदा
वाढत वाढत पसारा हा वाढला
वाढत्या पसाऱ्यात जीव माझा गलबलला

ठरविले देवाने पुऱ्या कराव्या साऱ्या इच्छा
मग सोडेल हा माझा थोडातरी  पिच्छा
एक छोटा विषाणू आला हळूच गप्प
साऱ्या जगाचा कारभार केला त्याने ठप्प

कामबीम  सुटले सर्व घरी राहते झाले
आराम आराम  सगळे आनंदमय झाले
परीवारासंगे वेळ मिळाला
चार दिवस छान गप्पा रंगल्या

प्रदूषणविरहित हवा झाली शुद्ध
ट्रॅफिकचा आवाज नाही सगळे शांतताबद्ध
वाटले काढावे सुंदर एक चित्र
रंगांना द्यावा उजाळा बनून एक मित्र

व्हायलिनवर सूर  छेडले
गीत उमटले नवे
जोपासून जुन्या छंदांना
आनंद मला मिळे

पण आता मात्र आला मला कंटाळा
समझून चुकले झाला आहे यंत्र मानव माझा
कि मी आहे कामाशिवाय न जगणारा जीन
कासावीस होतो आहे मी कामावीण

देवा आता तुझ्याकडे एक माझे मागणे
सुरळीत कर सारे, थांबव  कामाविण हे राहणे
बंद खोलीत जीव माझा गुदमरतो
बाहेर फिरण्यासाठी मी तडफडतो

अशा या आरामाला काय द्यावी उपमा
कि स्वीकारावे मी चाकोरीबद्ध  न आवडे बदल एखादा
विचार करता करता झालो मी गप्प
समाजेना  हे मजला वरदान कि शाप

सौ सुप्रिया समीर मडये
madyesupriya@gmail.com