कधी तरी येशील

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, May 09, 2020, 09:32:25 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.कधी तरी येशील*

खुप बोलायचं होतं
बोलायचं राहून गेलं
आयुष्यातलं उरलं सुरलं
सुख चाळून चाळून नेलं
तुला शोधून शोधून
कित्येक वाटा संपल्या होत्या
कित्येक रात्र दुःखात सांडल्या होत्या

कधी तरी येशील
मला कवेत घेशील
तुझ्या हाताच्या गोंदनाला
माझं नाव देशील
राजाची राणी होशील
याच आशेवर जगत होतो
उरल्या सुरल्या आशा शोधत होतो

माझ्या प्रेमाला
नाकारलं असशील
अनोळखी नात्याला
स्वीकारलं असशील
म्हणून येणार नसशील
आता काळजाने अंदाज बांधला होता
तुझ्या प्रतिक्षेचा काळ ही सांडला होता

तू विसरून गेली होतीस
प्रेमाच्या वस्तीतून गेली होतीस
तिथं ही पाऊल खुणा उरल्या होत्या
माझ्या अनेक अनेक रात्र तिथं सरल्या होत्या
तुला शोधन तिथं येऊन थांबलं होतं
पुन्हा एकदा तिथं आयुष्य शून्य झालं होतं

✍🏻(कविराज.अमोल मीरा दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर