व्यथा मुंबईकरांची

Started by jaydeshmukh2@gmail.com, May 09, 2020, 05:41:12 PM

Previous topic - Next topic

jaydeshmukh2@gmail.com

व्यथा  मुंबईकरांची......

घरात श्वास गुदमरतो म्हणुन थोडंसं बाहेर पडतो,
नेमकं त्याच वेळी आम्ही तुमच्या शिक्षेस पात्र ठरतो

तुम्ही रक्षण करता कायद्याचं त्याबद्दल काहीच शंका नाही,
पण एकाचा द्वेश आणि एकाला विनंती ह्या समिकरणाचा अंदाज मात्र मनाला पटत नाही

रोज बातमी येते आणि काळजाचा ठोका चुकत असतो,
आर्थिक संकटाच्या भस्मासुरासमोर मी रोज मान टाकुन झुकत असतो

दोष द्यायचा कुणाला , सगळेच यंत्रणेचा भाग होऊन बसलेत
श्रीमंत कमवुन बसलेत,
गरीब मदत घेऊन बसलेत,
मध्यम वर्गीयांना मात्र वगळलं गेले माहीत नाही कोणत्या शिक्षेचं ओझं ते भोगत बसलेत

तरी भोगतील ते शिक्षा,पण स्वभिमान मोडणार नाहीत,
ह्या संकटकाळी महाराष्ट्राला मुंबईकर एकटं सोडणार नाही

कवी
संदेश घारे