जादूई माझी आई

Started by sachinikam, May 10, 2020, 12:14:55 PM

Previous topic - Next topic

sachinikam

जादूई माझी आई
(कवी: सचिन निकम, मुरादमन)
नऊ मासांची सोसूनी कळ
दिले जगण्याचे तिने बळ
गाउनी भूपाळी नि अंगाई
जादूई माझी आई
जादूई माझी आई... १.

पहिला हुंकार जणू प्रणव ओंकार
पहिलं पाऊल जणू यशाची चाहूल
बनली यशोदा नि जिजाई
जादूई माझी आई
जादूई माझी आई... २.

सावलीत मायेच्या वाढविले
संस्कार माणुसकीचे घडविले
वाहिली गोदा नि कृष्णामाई
जादूई माझी आई
जादूई माझी आई... ३.

तिच्या भाकरीला साखरेची गोडी
आशिर्वाद सदैव असे जोडी
सोबत नसताना सुन्या दिशा दाही
जादूई माझी आई
जादूई माझी आई... ४.

sachinikam

Watch the full video on YouTube Channel: Skrinz Studios Music.
https://youtu.be/umUmdcwyCTc