दगडाच्या देवा

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, May 10, 2020, 02:47:19 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.दगडाच्या देवा*

प्रेम मिळवण्यासाठी
एक येड रोज खेट्या घालतं होतं
दगडाच्या देवा पुढं
रड रड रडतं होतं

भीक तर दिली नाही
काळीज मात्र जाळलं होतं
रोज फुलांच्या माळा चढवून ही
त्यानं प्रश्नाला उत्तर देणं टाळलं होतं

आता विश्वास ही रडतं होता
अंतकरणातून एक प्रेमी मरतं होता

मंदिराच्या पायऱ्या मोजून मोजून
एक प्रेमी थकला होता
देव ही आळशी कुठला
निर्णय देण्या चुकला होता

आता कोणत्या ही मंदिरात
कोणता प्रेमी जातं नाही
कारण तिथं गजर,आणि भीक
या पलीकडे काय भेटतं नाही

गाव कुसावर मढ पडलं होतं
सारं सारं विपरीत घडलं होतं

देवा आता निरोप
तिला पाठवू नको
तिच्या मनात माझं
प्रेम साठवू नको

कारण एक वादळ
आता शांत झालं होतं
पावसाच्या सरींनी
थैमान घातलं होतं

आत्मा अनंतात विलीन झाला
पुन्हा एक प्रेमी प्रेमात मलिन झाला

✍🏻(कविराज.अमोल मीरा दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर