गजरा

Started by SahyadriN, May 12, 2020, 11:23:39 AM

Previous topic - Next topic

SahyadriN

तुझ्या गजरया चा मोह होतो मला
सुवासिक सुगन्धा चा छंद जडतो मला
एक एका फुलाचे हसणं भावते मला
होउनी गजरा वसावे केशात वाटे मला

कुठुण जरी शोधुन तरी आनावीत
फुले ही सुन्दर वेचुनिया बनातुन
त्याचा ठाव आहे तुला नेमकी मीळावित
खेचिते ओढ ज्याची आहे तुला मनातुन

अलगद आणी हलकेच उचलावित
धरुनिया मुलायम अनामिका अंगुलितुन
स्पर्श तो होता तूझा मखमाली जानवित
तव थेंब एक झिरपावा हिरव्या देठातुन

मग रंग बिरंगी गुम्फावि एका ओवित
बसती मुकी ना काढी चकार मुखातुन
अंमल आहे असा, तुझच त्यानी ऐकावित
खुलुनी रुप फुलले जनु कोमल कळीतुन

खुलत्या बटा लांम्ब हलकेची बांधावित
तिरिप पड़े अधुन मधुन दिसे दर्पनातुन
गन्ध कस्तुरी सम आहे वेनीचा पसरवित
मुक्त दरवळे चोही काळयाभोर कुन्तलातुन ...npd
[/size]