कुणाचा

Started by SahyadriN, May 13, 2020, 06:23:12 AM

Previous topic - Next topic

SahyadriN

होतो असा मी की होतो कुणाचा
नाही असा मी की नाही कुणाचा

मी ओढले जगाचे आळ माझेवर
यातना मज जरी गुन्हा कुणाचा

शोधीतो स्वप्नास रात्री अन्धारात
नयनी आसू तराळी तरी कुणाचा

वेदनेस फूंकर घाली खोटा दिलासा
खप्ल्यानी कधी घाव झाकला कुणाचा

वागलो या जगी मी की एकटा नाही
मनीचा ठाव जाणीला कुणी कुणाचा

देहास माझ्या ओझे माझेच जाहले
आत्मा कुठे झाला सखा कुणाचा
npd