फक्त तू...

Started by Tejaswi Mohite, May 13, 2020, 11:19:08 AM

Previous topic - Next topic

Tejaswi Mohite

भयानक परिस्थितीत सुद्धा
तू मला घट्ट पकडून ठेव
जाईल तोल माझा
मला सावरायला पुढं ये
सुचेना काही तेव्हा
मायेचा आधार दे
गोंधळतेय रे मी
खूप साऱ्या अडचणी आणि
त्यातच आता थकुन जातेय मी
स्वतःचा विचार नाही करू शकत
पण माझ्या या काळातसुद्धा
तू माझा एक गोड विचार हो
पडतील वाईट पाऊले माझी
पण त्या पाऊलांसाठी तू माझी अचूक वाट हो
दुःखवेल तुलाही खूप
पण ते सुद्धा क्षणभंगुर असेल
राग सुद्धा माझा मर्यादित असेल
कारण तुझ्यापेक्षा जास्त मला काहीच महत्वाचं नसेल

                                 #तेजस्वी मोहिते

Rohan Rajendra Bhosale

छान कविता आहे. माझं "प्रेम काव्य" नावाने युट्यूब चॅनेल आहे. त्यात मी माझ्या कविता आणि इतर कवी, कवयित्री यांचे कविता अपलोड करतो. त्यांच्या सहमतीनेच.. तुम्ही तुमची एखादी कविता द्याल का? माझा नंबर आहे - ८१०८९१९२३४

चॅनेल लिंक - https://www.youtube.com/channel/UCLZ1vUbt0U_2KvFj2jcPYyg