काळा कावळा...

Started by Tejaswi Mohite, May 13, 2020, 11:21:02 AM

Previous topic - Next topic

Tejaswi Mohite

आकाशात एकटक पाहत असता फडफड करत कर्कश आवाज काढत एक कावळा मुक्तपणे वावरत होता...शुभ्र नभ मला आकर्षीत करत असता त्या कावळ्याने माझं लक्ष विचलित केलं..त्याचकडे पाहून मला त्याची कोणतीच गोष्ट मनी भावत नव्हती...पण तस म्हणता त्याची काय चूक ना??...तो तर त्याचं काम करत होता..प्रश्न माझाच होता की मी कोणावर न कसं लक्ष द्यावं..शुभ्र नभ मला मनाने स्वच्छ राहा असं सांगत असता त्यात तो कावळा येऊन हे सांगून गेला की भल्या मोठ्या आकाशात मी मुक्त संचारतो...आवाज भलेही माझा कर्कश असुदेत पण तीच तर माझी ख्याती आहे..ह्या जगात जर स्वतःच आस्तित्व टिकवत असशील तर आधी स्वतःचा विचार कर ..मग तुझ्या वाटेत नाव ठेवणारी लाख जण जरी पुढं येत असतील तरीही....
#तेजस्वी मोहिते