अपेक्षांचं ओझं...

Started by Tejaswi Mohite, May 13, 2020, 11:22:40 AM

Previous topic - Next topic

Tejaswi Mohite


डोक्यावरती भार जास्त होतोय
म्हणून जरा कमी करावा वाटला
नक्की ओझं कशाचे झाले
आत उघडून पाहता त्यात
अपेक्षांचाच पसारा दिसला
त्याही दुसऱ्यांकडून ठेवलेल्या
आणि कधीच पूर्ण न झालेल्या
होतो तो फक्त त्रास
ठरवलं मनात हा भार इथंच टाकून
पुढं चालत राहायचं
इतरांनवरही लादायचं नाही
आणि स्वतःही घ्यायचं नाही
असं ते अपेक्षांचं ओझं..

                   -- तेजस्वी मोहिते