तिला पत्र

Started by Pranit_Kadam, May 13, 2020, 03:50:15 PM

Previous topic - Next topic

Pranit_Kadam

पत्र लिहायला शब्द लागतातच कुठ?

मनाच्या एका कोपर्याला ती अलगद हात घालते,
पटावर जेव्हा एखादा रंग इतरांहून तीव्र होतो,
प्रियकराची स्मृती जेव्हा आपल्या अस्तित्वाचाच ताबा घेते,
तिला मागणी घालताना जेव्हा सगळी माया एकवटून डोळ्यात उभी राहते,
जेव्हा मनातले काहुर लेखणी पर्यंत पोचते,

कविता करताना जेव्हा तिची छटा स्वतः समोर दिसते,
तिच्या चालण्यावर लिहिताना जेव्हा तिची पैंजण च ऐकू येते,
आत दडलेली ती भावना जेव्हा इतकी अनावर होते,
गप्प राहण जेव्हा अशक्यच वाटू लागत,
रात्रिच्या वेळी बेभान सुटलेल्या विचारांना,
स्वछंदी वावर असनार्या या लहरींना,

खरच,
पत्र लिहायला शब्द लागतातच कुठ?
                                                  -प्रणित