प्रेम काव्य

Started by Rohan Rajendra Bhosale, May 13, 2020, 05:38:16 PM

Previous topic - Next topic

Rohan Rajendra Bhosale

नमस्कार कवी, कवयित्री.. मी रोहन भोसले.
मराठी चित्रपट सृष्टी मधे कवी, गीतकार, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून काम करतो. आणि आजवर माझे बरेच प्रोजेक्ट रिलीज झालेले आहेत. आणि माझं "प्रेम काव्य" नावाने युट्यूब चॅनेल आहे. त्यांवर मी माझे कविता आणि इतर कवी, कवयित्री चे कविता अपलोड करतो. त्याच्या सहमतीनेच. तुमच्या पैकी कोणाला जर आपल्या चॅनेल साठी कविता द्यायची असेल तर मला मेसेज करा माझा नंबर - ८१०८९१९२३४
चॅनेल लिंक...

https://www.youtube.com/channel/UCLZ1vUbt0U_2KvFj2jcPYyg

Akshay songhare


मी त्या बेवड्या सारखा आहे
जसा तो त्या दारुच्या बोटल वर प्रेम करतो
तसं मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो


मी त्या बेवड्या सारखा आहे
त्याला माहीती आहे की दारू पिल्याणे त्याचं लिवर कमजोर होईल
तरीही तो  ती बोटल ह्रदयाला लावुन बसतो
तसं मला माहिती आहे तूला आठवल्या नंतर खूप त्रास होतो
तरीही मी सारखं सारखं तुझ्या आठवणीत बसतो


मी त्या बेवड्या सारखा आहे
त्या दारूच्या बोटल वर लिहिले असतं (दारू स्वस्थासाठी हानिकारक आहे)
तरीही तो त्यातले दोन थेंब हि न सोडता पुर्ण बोटल प्रेमाने पिउन टाकतो
तसं मला माहिती आहे तु मला आपलं कधी नाही समजणार
तरीही मी घरच्यां पेक्षा जास्त तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो


मी त्या बेवड्या सारखा आहे
शेवटी मरताना ही तो दारू चांगली होती
साला लिवर कमजोर निघालं असं बोलत बसतो
तसं मला माहिती आहे मी कुठे तरी तुझ्या नजरेत कमी आहे
तरीही मी नशीबाला दोष देत बसतो