पहिलं आणि शेवटचं

Started by Trunal Tibude, May 13, 2020, 09:24:00 PM

Previous topic - Next topic

Trunal Tibude

आयुष्यात पहिल्या गोष्टी खूप खास असतात,
पहिला श्वास, पहिली नजर, पहिलं रडणं,
पहिलं पाऊल, शाळेचा पहिला दिवस,
शाळेत मिळालेला पहिला मित्र,
पहिला निकाल, शाळेतली पहिली मैत्रीण,
शाळेतलं झालेलं पहिलं प्रेम
नंतर कॉलेजचा पहिला दिवस
कॉलेजचे ते पहिले मित्र
पहिलं प्रेम, पहिलं प्रेमाचा स्पर्श
पहिली भेट,
नंतर पहिली नोकरी
पहिला पगार,
आपल्या पगारातून आई वडिलांना
दिलेली ती पहिली भेटवस्तू,
पण शेवट नेहमी मन दुखावून जातो,
शेवटचा श्वास, शेवटची नजर,
शेवटचं पाऊल, शाळेतील शेवटचा दिवस,
कॉलेजचा शेवटचा दिवस,
मित्रासोबत घालवलेले ते शेवटचे क्षण,
शेवटची भेट, शेवटची साथ,
नोकरीचा शेवटचा दिवस,
शेवटचा पगार,
आई वडिलांचा शेवटचा आशीर्वाद,
पण प्रत्येक पहिली होणारी गोष्ट संधी सोबत घेऊन येते
आणि शेवट अनुभव देऊन जातो.....
#तृणालरामलालतिबुडे
8623932353