स्वप्नातली तु

Started by Pranit_Kadam, May 14, 2020, 09:50:23 AM

Previous topic - Next topic

Pranit_Kadam


स्वप्नातली तु

केव्हा तरी एखाद्या शांत रात्री,
तु आणि मी फक्त दोघेच असावे..
अवखळ झर्याच्या किनार्यावरुन चालताना,
तुला पाण्यातल्या तार्यांचा मोह व्हावा..
तुझी नजर हरिणीपरी चौफेर फिरत असावी,
पण माझ्या डोळ्यांना फक्त तुच दिसावी..

नितांत शांततेत पाण्याचा मधुर नाद,
तुझ्या चंचल पावलांचे जमिनिवरील पडसाद,
हातात हात घातलेले तु आणि मी,
तुझ्या डोळ्यांत दिसणारी वेडी माया,
माझ्या मनात काहुर माजवणारी तुझी काया..
त्या करुण शांततेत दोन मने पेटून उठलेली,
मोहाच्या नाजुक पाशात सामावून गेलेली..

वरुण रात्री चा सुगंधी वारा,
वार्यात अलगद मिसळणारा तुझा श्वास,
क्षणोक्षणी वाढणारा श्वासांचा वेग,
त्या वेगाचा अर्थ कळून चूकलेला मी..
तुझ्यावर खिळलेली माझी भारावलेली नजर,
अन त्या नजरेच्या अवखळ स्पर्शाने लाजुन गेलेली तु..
स्मरण जिथे संपते त्या सीमे वर,
प्रेमा च्या त्या मधुर शिखरावर,
मला फक्त तुच दिसतेस, रोज, फक्त तु..
               
                                                     - प्रणित



Rohan Rajendra Bhosale

छान कविता आहे... मी रोहन भोसले.
मराठी चित्रपट सृष्टी मधे कवी, गीतकार, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून काम करतो. आणि आजवर माझे बरेच प्रोजेक्ट रिलीज झालेले आहेत. आणि माझं "प्रेम काव्य" नावाने युट्यूब चॅनेल आहे. त्यांवर मी माझे कविता आणि इतर कवी, कवयित्री चे कविता अपलोड करतो. त्याच्या सहमतीनेच. तुमच्या पैकी कोणाला जर आपल्या चॅनेल साठी कविता द्यायची असेल तर मला मेसेज करा माझा नंबर - ८१०८९१९२३४