कोरोना नाण्याची दुसरी बाजू

Started by Shubhangi Gaikwad, May 15, 2020, 12:19:10 PM

Previous topic - Next topic

Shubhangi Gaikwad

कणं नी कणं  झिजत होत माझं हे तन
मिळविण्यासाठी गरजे पलीकडले धन
कळलेच नाही मला मरत होतं प्रत्येक क्षण
माझ्यातील हतबल झालेलं निरागस मन
कारण जागा झाला होता माझ्यातला रावण

  सहन करत होता अत्याचार, पृथ्वीवरचं वातावरण
नदी नाल्यांनाही त्रस्त करत होत, मानवनिर्मित प्रदूषण
विषारी वायून कोमेजली झाडे, हरवती  हिरवेपण
हदपार केले वन्यजीवाना, झाले जिवन त्यांच कठीण
करुणा आली सार्यांची ,मदतीला धावला COVID 19

घराच्या प्रवेशद्वाराला, कोरोनाने मारली रेषा लक्ष्मण
राहून सुरक्षित घरात, जगा माणसातलं माणूसपण
बाहेर पडायचे असेल तर, करा कवचकुंडल धारण
नाहीतर नाहक गमवाल, तुम्ही तुमचे अमुल्य प्राण
देतो इशारा सतर्कतेचा, राहा आता सावधान

विसरलो होतो आवडी निवडी, छंद अन् फुलांचा गंध
मायेची ऊब आणि कुटुंबाच्या सहवासातला आनंद
कोरोना आला, आणि मनाचे  फुलपाखरू झाले स्वच्छंद
आता हरवलेले गवसले, मनाने झुगारून दिले  सारे बंध
घेऊनी तनमनाच्या आरोग्याची काळजी झालो मी सुज्ञ

माणूसाच्या वेगवान जीवनाला, कोरोना तु ब्रेक दिलास
आजुबाजुला बघ, जग किती सुंदर आहे सांगुन गेलास
नदीची निर्मलता, हवेची शुद्धता बहाल करवून गेलास
निरभ्र आकाशातील असंख्य तार्यांचे दर्शन घडवलसं
प्रतेक नाण्याच्या दोन बाजू, चांगली वाईट दाखवून दिलसं

शुभांगी  गायकवाड
shubhgaik@gmail.com