तू समीप येता

Started by sachinikam, May 17, 2020, 10:14:46 AM

Previous topic - Next topic

sachinikam

तू समीप येता  (कवी: सचिन निकम, मुक्तस्पंदन)

तू समीप येता, दीप मनी मिणमिणले
धुंद गंधीत वारे, हळूच कानी गुणगुणले.

तू समीप येता, घंटा मंदिरी किणकिणल्या
निरभ्र काळोख्या नभी, टपोर चांदण्या टिमटिमल्या.

तू समीप येता, श्रावणधारा रिमझिमल्या
हर्षोल्हासीत मयूरपिसारा, पाहूनि लांडोऱ्या थुईथुईल्या.

तू समीप येता, जीभ शब्दांत अडखळली
काळजातली गुपीतगाणी, नयनांतुनी दरवळली.

सागरा भेटावया, सरिता सरसावूनि कळवळली
मिलींदा भेटावया, सुमने कळ्यांची हरवळली.

तू समीप येता, वाटे जग सारे नवे
तू समोर अशी राहा, सौख्य हेचि मला हवे.

तू समीप येता, आवेगली स्पंदने
वाटे मिठीत घ्यावे, तोडुनी सारी बंधने.

Copyrights: Skrinz Studios
sachinikam@gmail.com
9890016825