आत्ताच कुठे

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, May 17, 2020, 11:06:09 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.आत्ताच कुठे*

आत्ताच कुठे मी तिला
आवडायला लागलो होतो
तिच्या काळजाच्या स्पंदनात
कुठे घर करायला लागलो होतो

तिला प्रेमरूपी डोहात बुडवून
कायमच माझ्यात एकरूप करायचं
त्यासाठी नव्या नव्या योजना आखून
मग तिच्या हातावर माझं नावं गोंदायचं

ती जणू सुंदर सुंदर गीतांचा
अगणित नजराणा घेऊन यायची
पाहून तिला मस्तकातील साऱ्या
आयडियांची राख रांगोळी व्हायची

तिला चोरून चोरून पाहणं थांबवून
आता खुल्ले आम तिला भेटायचं व्हतं
साऱ्या लोकांच्या नजरे समोर तिला
घरात अर्धांगिनी म्हणून आणायचं व्हतं

तिला पाहून पाहूनचं जगतांना
पाचरटाच्या घरात बंगल्याचं स्वप्नं दिसलं
या लक्ष्मीची पावल घरात पडतील तेव्हाच
काळावरच खुरटं रान हिरवं होऊन हसलं

ती दिसायला एव्हडी सुंदर होती की
माझी सारी शुद्ध ही हरपून जायची
ती कधी कधी डोळ्यासमोर नसायची ना
मग अधुऱ्या स्वप्नांची भाकर करपून जायची

✍🏻(कविराज. अमोल मीरा दशरथ शिंदे).
मो.९७३७०४०९००.अहमदनगर