तुला पहावं म्हणून

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, May 18, 2020, 11:15:53 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.तुला पहावं म्हणून*

तू गाव कुसाच गाणं
मी वाहत पाणी गं
तुला पाहतो रोज मी
Dp मध्ये वेड्या वाणी गं

तुझी आसवे माझ्या
प्रेमाची निशाणी गं
भेटू आपण लवकरचं
तूच तर माझी राणी गं

तुला पहावं म्हणून
रोज लिहावं वाटतं गं
स्वप्नांच्या गाण्यात
तुला भरावं वाटतं गं

तुझ्या गोड गोड गप्पाचा
मला रोज मोह लागतो गं
तू असतेस जवळ तरी
थोडं प्रेमाचं पाणी मागतो गं

असं किती छळणार तू
जरासा विश्वास ठेवं गं
सवय लागली तुझी आता
कर नंबर माझा सेव गं

क्षणासाठी येऊन तू
पूर्ण लॉकडाऊन होतेस गं
वाट पाहत बसतो मी तू
Last seen ही बंद करतेस गं

✍🏻(कविराज.अमोल मीरा दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर