कन्यादान

Started by Meera Pitale, May 18, 2020, 10:20:51 PM

Previous topic - Next topic

Meera Pitale

कन्यादान!!

इवल्याशा त्या जीवाला जपलस
तळ हाताच्या फोडा सारखं
करून दान तिचे तु सहज केलेस तिला परकं...

माणसाने बनवल्या ह्या
चाली रीती सार्या
कसा धीर झाला तुझा
त्या पुर्ण करायला....

दान हे सर्वश्रेष्ठ काम आहे
ऐकले होते
पण कन्येचे दान करून
तु काय साधले होते....

जन्म दात्यानेच माणुस म्हणायचा
हक्क काढून घेतला,
करुनी दान तीचे एक
वस्तू सम पाठवले तिजला....

आता तिकडे कोण
विचारी तिचे मन,
वस्तू ला नसतच
ना ते पण...

का नाही लढलास त्या रितींशी
आपल्या लेकीसाठी
कन्येचे दान नाही पण
तिचे मन जाणावे ह्यासाठी...

तुझ्या या दानाची किमत
ती मोजते आहे
दूर राहून पदोपदी ती
सगळच सोसते आहे!!!

- मीरा के बोल