नको गळफास फक्त श्रमदानाचा ध्यास

Started by Shubhangi Gaikwad, May 20, 2020, 10:46:36 AM

Previous topic - Next topic

Shubhangi Gaikwad

भेगाळल्या जमिनीवरी सांडे अश्रूच टिपूर टिपूर
विरघळे तप्त माती मंदी होऊनी कापूर कापूर

कासावल्या जमिनीवरी  तापलेल्या ऊन्हाचा तो मार
होऊनी असहाय्य सोसे पाठीवरी जणू आसूडाचा वार

शेतकरी माझा धनी रात्रंदिस  राबला काळ्या मातीत
झाली कोरडी नजर शोधूनी शोधूनी काळे मेघ आभाळात

कधी येशील राजा वरूणा कधी पिकविण धानं
कधी फिटणार डोक्यावरलं सावकाराचं देणं

गीळूनी आसव,आवळलं गच्च पोट थांबविली भूक
लेकराच्या भुकेसाठी उरे तुकडा भाकरीचा एक

कधी अवकाळी पावसानं पीक सोन्याच वाहून जाई पारं
कधी उडून जाती दूर काळे ढग,जाई जळून शिवार सारं

झाला रंक शेतकरी सोडूनी घरदार वार्यावरी लावी गळाफास
विसरे तो,किडा शेणातला पडे बाहेर,धरूनी मेहनतीची कास

लाचार झाला शेतकरी नशीबानं मांडली थट्टा क्रूर
वाचावया घरदार जोडले हात, पसरला पदर दरोदार

आले धावुनी देवदूतापरी, नाना, मकरंद अन् अमीर
दिसला आशेचा किरण,हिमतीने ऊभी आता खोचूनी पदर

नको अश्रू, आता ध्येय एक, हात पूढे फक्त देण्यास  श्रमदान
हरवले ते  गवसले शब्द आता, जय जवान अन् जय किसान

घेऊन कुदळ फावडा हाती, करू काम जल संवर्धनाच
चला करू एकजूटीनं सारे,स्वप्न साकार पाणीदार गावाच


शुभांगी सुभाष
shubhgaik@gmail.com