अस्तित्व

Started by Priyanka parkhi, May 20, 2020, 11:48:38 AM

Previous topic - Next topic

Priyanka parkhi

अस्तित्व

का शोधत फिरते तुझे अस्तित्व तु
नारी अबला नाही सबला तु..

तू तर रचला आहेस स्वराज्याचा पाया
तू तर घडवीला आहे या मातीतून वीर शिवा

तू तर ज्योतींची सावित्री
तू तर गोपाळांची आनंदी

तू दिला या देहाला जन्म
तू निभावले मातृत्वाचे सर्व कर्म

घरा घरातली लक्ष्मी तु
सरस्वती तु
आदिशक्ती तू
अन्नपूर्णा ही तू

कधी गाणं कोकिळा लताताई तु
तर कधी कवितेतली बहिणाबाईही तु

सिंधुताई होऊन माया केली
राणी लक्ष्मीबाई होऊन शूर पराक्रमी झाली

आई ताई आत्या काकू
मावशी मामी आजी सासू
तुझे नाव अनेक पण माया मात्रं सर्वांना लावशी तु

द्रौपदी होऊन न्याय मागणं सोड तु
स्वतः साठी आता स्वतः लढ तु
नारी अबला कधी नव्हतीच तु

ANJALI PANDE

खूप सुंदर 👍👏

ANJALI PANDE

खूप सुंदर 👍👏

ANJALI PANDE

खूप सुंदर 👍👏

nareshKwankhade


maheshk

विषय खूप चांगला आहे परंतु त्याला न्याय द्यायला जमलेले नाही.
शब्द खूपच साधारण वापरले आहेत, रचनाही एकसारखी नाही...
एकंदरीत खूपच सामान्य लिखाण वाटले  :-\