माझी होशील का?

Started by जगताप अक्षय, May 20, 2020, 10:59:05 PM

Previous topic - Next topic

जगताप अक्षय

 माझी होशील का?

सुंदर होत आपल ते प्रेमळ जग,
पुन्हा तुझा प्रेमी बनवशील का?
प्रेमात असलेल अंतर मिटवून,
पुन्हा माझी प्रेमिका होशील का?

मी दुःखी असलेला पाहून,
प्रेमाने हात हातात घेशील का?
सुंदर हसरा चेहरा करून,
पुन्हा I love u बोलशील का?

तुझ्या आठवणीने आलेले अश्रू ,
हळूच प्रेमाने सावरशील का?
मी तुझीच आहे असा बोलून,
पुन्हा तुझ्या मिठीत घेशील का?

अर्धवट भेट पूर्ण करण्यासाठी,
स्वप्नात माझ्या भेटशील का?
आजपण खूप प्रेम करतो तुझ्यावर,
पुन्हा माझी प्रेमिका होशील का?


                                - जगताप अक्षय