प्रणिता

Started by Sagar Bhave, May 21, 2020, 12:24:37 PM

Previous topic - Next topic

Sagar Bhave

कधीतरी मनातलं बघून लिहावं
कधीतरी तिलाही अठवाव
डोळ्यातील आसावत
तिला साठवावं
आसवांचा सागरात तिला शोधावं
दमछाक होऊन तिथेच निजावं
उठावं त्या स्वापणांच्या उन्हामध्ये
डोळे उघडावे तिचा मांडीवर तिचा केसांच्या सावलीमध्ये
क्षण क्षण घालवावा तिचा मिठीत
उन्हाची संध्या व्हावी अटीत
हातात हात तिचा जसा स्वप्नसारखा
सत्यात आहे की नाही ती तारका
सोडून हात ती धावू लागली
तिचा मागे धावताना जाग येऊ लागली
घट्ट मिटू लागलो मी डोळे
की क्षणभर वाढावे हे स्वप्न थोडे
ती जशी हळू हळू नाहीशी झाली
बसलो त्या स्वप्नातच तरी ती नाही आली
उघडले मी डोळे संपवायला ते स्वप्न
अस्तित्व रंगवण्याचा केला प्रयत्न
बाजूच्या कुशी वर ती निजली होती
डोक्यावर हात फिरवत ती पडली होती
काही वावग स्वप्न पाहिलं का ती विचारात होती
हात हातात घेत मी मिश्किल हसलो
स्वप्नांची गरज नाही अस तिला म्हणालो
मग मात्र मला खरं जाग आली
एकटाच होतो मी प्लॅटफॉर्म वर आणि माझी ट्राम आली
एकटाच होतो मी प्लॅटफॉर्म वर आणि माझी ट्राम आली

Yogesh9889