भाकरीवर अत्याचार

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, May 22, 2020, 10:48:41 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.भाकरीवर अत्याचार*

रातीला जेव्हा भाकर आवाज देते
तेव्हा रस्त्यावर चालणाऱ्या जीवांनी
तिच्यावर केलेल्या अगणित अत्याचाराचा
हिशोब कोणाला विचारावा म्हणून
कधी कधी भाकर काळजावर
ठेऊन तिची विचारपूस करतो
अगं खरंच का गं तुझी
कोणाला किंमत आहे का इथे

तू कधी मुक्याजनावरांची
तर कधी अनाथांची भूक
भागवणारी आई झालीस
अगं तूचं पोट भरण्यासाठी धावून आलीस
का इथं तुला जपणारी लोक कमी आहेत
तोड तोड तोडतात लचके तोडल्यासारखं
अन कधी कधी फेकून ही देतात तुला
त्या कचरा कुंडीवर ......

अगं आठव हिचं ती लोक ना
सूट बूट घालून यायची
तिरस्कार रुपी अत्याचार करायची
जी कधी पिज्जा बर्गर शिवाय खात नव्हती
आता त्यांना तुझी आठवण आली
आता कुठं तू यांना मिळायला लागली
खरी किंमत तुझी यांना कळायला लागली

आता खऱ्या अर्थान
देवानं तुला संधी दिली आहे
तुझ्या वर झालेल्या अत्याचाराचा
हिशोब चुकता करायचा आहे
याच लोकांना आता उपाशी मारायचं आहे
पण तू ही एक आई आहेस पोट भरणारी
म्हणून हळवं होऊ नकोस
विचार तू यांना तुझ्यावर
अत्याचार करायचं कारण काय...........???

✍🏻(कविराज. अमोल मीरा दशरथ शिंदे)..
मो.९६३७०४०९००.अहमदनगर