शाळा

Started by k_snehaa, May 22, 2020, 10:22:17 PM

Previous topic - Next topic

k_snehaa

शाळेचे दिवस, म्हणजे मौजमजाच जणू
कळेना मनास, ते दिवस पुन्हा कसे आणू

हसतखेळत जगणे आणि स्वच्छंद वागणे
बालपण देगा देवा, आम्हा पामरांचे मागणे

ती प्रार्थनेची सुरूवात आणि राष्ट्रगीताची सांगता
मिळालेले वरदान जणू, देवा दिलेस न मागता

तो नाडकर्णी मँडमचा मराठीचा तास
कसं सांगू किती होता, आमच्यासाठी खास

आयुष्याच्या शाळेपेक्षा, बरी होती आमचीच शाळा
ते वह्यापुस्तकांचं दप्तर आणि तो काळा फळा

राबाडे सर नावाचे, होते कडक मास्तर
टवाळखोर मुलांना, फेकून मारायचे डस्टर

काय वर्णू शब्दांत मी, ती मधल्या सुट्टीची मजा
त्या अर्ध्यातासापुरते होतो, आम्हीच आमचे राजा

चला मित्रमैत्रीणींनो,पुन्हा एकदा शाळेमध्ये जाऊ
मिळूनी सर्व एकमुखाने,गुणगान शाळेचे गाऊ



स्नेहा कालेकर - घोरपडे