तुच चंद्र माझा....

Started by Deeksha, May 23, 2020, 02:06:16 AM

Previous topic - Next topic

Deeksha

तुच चंद्र माझा, मी तुझीच चांदणी रे...
तुच सखा माझा, मी तुझीच सावली रे...

स्वप्नापरी मज भासे सगळे..
आहे सत्य की ,आभास हे खुळे..
बदलुनी गेले, जग माझे सारे...
तुजवीन ना येई,कोणता ध्यास मना रे...

तुच चंद्र माझा ,मी तुझीच चांदणी रे....

पाहीले, ना कधी, मला मी इतके..
पाहीले, तुझ्या नजरेत, मला मी तितके..
एक-एक श्वास, जगते आता नव्याने रे...
शोधता अस्तित्व माझे,तुझ्यातच गवसते रे..

तुच चंद्र माझा,मी तुझीच चांदणी रे...
तुच सखा माझा, मी तुझीच सावली रे...

Rohan Rajendra Bhosale

कविता खुप छान आहे. नमस्कार मी, रोहन भोसले.
मराठी चित्रपट सृष्टी मधे काम करतो. कवी, गीतकार, अभिनेता म्हणून. आणि माझं "प्रेम काव्य" नावाने युट्यूब चॅनेल आहे. त्यांवर मी माझे कविता आणि इतर कवी, कवयित्री चे कविता अपलोड करतो. त्याच्या सहमतीनेच. तुमची कविता द्याल का? माझा नंबर - ८१०८९१९२३४
चॅनेल लिंक 
https://www.youtube.com/channel/UCLZ1vUbt0U_2KvFj2jcPYyg

Deeksha

होय माझी सहमती आहे...तुम्ही माझी कविता अपलोड करु शकता!
माझं नाव दिक्षा गावित असुन मी नासिक ला राहते! आपल्या प्रतिसादाबद्दल आभार..