तुला पाहतो ग

Started by Shubhangi Gaikwad, May 24, 2020, 12:04:51 PM

Previous topic - Next topic

Shubhangi Gaikwad

स्वप्नातल्या नयनरम्य सरोवरात जल शांत अन् नितळ
वर क्षितीजाल भिडलेलं घूमटाकार निरभ्र निळं आभाळ
भोवताली पाचूची हिरवी शाल लेऊनी ऊभी सुरेख कमळं
त्यात तू अन् मी करतो विहार करूनी निर्मळ मन मोकळं ग
तुलाच पाहतो ग

सरोवराच्या काठावर बसून नजरेने खूप गप्पा मरतो
तुझ्या गालावरून ओघळणारे जलबिंदू अलगद टिपतो
डोळ्यावर येणार्या खट्याळ बटांना हळूवारपणे सारतो
किरणांनी तेजोमय झालेल्या तुझ्या रूपाने मी भारावतो ग
तुलाच पाहतो ग

न बोलता खूप काही बोलतात भाव तूझ्या नजरेतले
जाणवतात सूरात चाललेली स्पंदने तुझ्या ह्र्दयातले
मंत्रमुग्ध करतात मला मंद स्मित तुझ्या ओठातले
रोमांचीत करते मला; सुख तुझ्या कोमल स्पर्शातले ग
तुलाच पाहतो ग

जीवनवळणावर पाहताच क्षणी झालीस तु माझी सखी
जरी असलो तुजसाठी मी फक्त एक वाटसरू अनोळखी
वेड लागले जीवा तु ह्र्दयसम्राज्ञी अन् तुच माझी चंद्रमुखी
जर झालीस तू माझी असेन माझ्या सारखा मीच सुखी
दिसे न मज कोणी ह्या भूलोकी अजूनही तुझ्या सारखी ग
तुलाच पाहतो ग


शुभांगी सुभाष
shubhgaik@gmail.com

vishalrpawar

विशाल रा पवार

Rohan Rajendra Bhosale

chan kavita ahe madam..
मस्कार कवी, कवयित्री.. मी रोहन भोसले.
मराठी चित्रपट सृष्टी मधे कवी, गीतकार, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून काम करतो. आणि आजवर माझे बरेच प्रोजेक्ट रिलीज झालेले आहेत. आणि माझं "प्रेम काव्य" नावाने युट्यूब चॅनेल आहे. त्यांवर मी माझे कविता आणि इतर कवी, कवयित्री चे कविता अपलोड करतो. त्याच्या सहमतीनेच. तुमच्या पैकी कोणाला जर आपल्या चॅनेल साठी कविता द्यायची असेल तर मला मेसेज करा माझा नंबर - ८१०८९१९२३४
चॅनेल लिंक...
https://www.youtube.com/channel/UCLZ1vUbt0U_2KvFj2jcPYyg
Modify message

Shubhangi Subhash Gaikwad

नमस्कार मी शुभांगी सुभाष गायकवाड, मुंबई
तुम्हाला माझी कविता आवडली
त्या बद्दल  तुम्हा दोघांचे धन्यवाद.
मी रोहन भोसलेना सहमती देत माझी ही
कविता त्यांच्या युट्यूब चॅनलवर अपलोड करण्यासाठी.

Rohan Rajendra Bhosale

mala hya number var msg kara madam - ८१०८९१९२३४
चॅनेल लिंक...
https://www.youtube.com/channel/UCLZ1vUbt0U_2KvFj2jcPYyg