तुला पाहते रे

Started by Shubhangi Gaikwad, May 24, 2020, 12:31:47 PM

Previous topic - Next topic

Shubhangi Gaikwad

येणार कोणीतरी लागली चाहूल, आली मनास जाग
कोणीतरी होऊ पाही माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग

उजाडला तो दिवस भेटण्या मजला आलास माझ्या घरी
नकळतच शहारले मनी अन् दाटले भीतीचे काहूर ऊरी

तुला पाहण्या आधी तुझ्या मुखातले शब्द पडले माझ्या कानी
झाले मोहीत ऐकूनी आत्म्यविश्वासाने भरलेले शब्द ते वजनी

उत्सुकतेने हळूच पाहिले दूरून तुझे रूबाबदार व्यक्तीमत्व
भारदस्त शरीर आणि करारी नजर ह्याचेच मज वाटले महत्व

देण्यास पाहूण्यांना दिली आईने चहाची कपबशी मम हाती
देताना चहा तुजला,भीतीनं थरथरत्या हाताची वाढली गती

नजरेला भिडताच नजर विलंब न करता दिलास मज होकार
निर्णय घेण्याची तुझी तत्परता,सांगून गेली कर त्याचा स्विकार

भारावले मी मनोमनी, पाहूनी चैतन्याची ज्वलंत ज्योत
स्वप्न साकार करील जीवनाच, हेच ते जन्मोजन्मीच नात

बांधुनी रेशीम गाठी झालास मम जीवनाचा अविभाज्य भाग
सार्थ अभिमान वाटतो, लाभले मजला तव अर्धांगिनीच भाग्य

होऊनी सावली माझी, व्यापलेस तू माझे तनमन सारे
आत्मविश्वासाने, प्रतिबिंबात माझ्या तुलाच पाहते रे


शुभांगी सुभाष
shubhgaik@gmail