हुंदका

Started by sachinikam, May 24, 2020, 07:48:07 PM

Previous topic - Next topic

sachinikam

हुंदका (कवी: सचिन निकम, मुकुटपीस)

पडला अकाली घाव काळजावर
मोडला निकाली डाव अर्ध्यावर
काय दिसेना सुन्न अंधार
काही सुचेना विषन्न निराधार
शिवले ओठ सुकला कंठ
ओघळली आसवे फुंकला श्वास
आखला बेत असा फिस्कटला
मांडला डाव कसा विस्कटला
धगीच्या चटक्यात जीव होरपळला
यातनांच्या फटक्यात श्वास गुदमरला
सांगताही येत नाही, लपवताही येत नाही
हुंदक्यवार हुंदका गिळते ग बाई.
हुंदक्यवार हुंदका गिळते ग बाई..
हुंदक्यवार हुंदका गिळते ग बाई...

sachinikam@gmail.com
Skrinz Studios Music YT channel