मुक्त श्वास

Started by Ira, May 25, 2020, 12:04:55 AM

Previous topic - Next topic

Ira

कवितेचे नाव ---मुक्त श्वास
-----------------------------

मन आहे उदास उदास,
मुसमुसणारे भाव कोंडले मी त्यात.

अदृश्य अशा शत्रूशी युद्ध आहे खास,
इवल्याशा जीवांना घेता येत नाही आज श्वास.

अशाश्वत अशा भीतीची किती समीकरणे मांडू,
का मुक्त झेपावणाऱ्या पक्ष्यांना हितगुज मी सांगू.

स्वातंत्र्य असे हिरावून शत्रू मोकाट आहे,
का माणसांच्या गर्दीला आज दृष्ट लागली आहे??

सुखावून जाऊ पक्ष्यांचे किलबिल गीत ऐकून,
की निराश होऊ अजाणत्या अशा विषाणूचा विळखा पाहून?

आज माणूसच माणसाशी परका
झाला आहे,
घरी राहून माझा जीव रेंगाळला आहे.

स्वातंत्र्याचे मोल आज खरे उमजले,
अन्नासाठी वणवण भटकणारे जीव किती होरपळले!

देवदूत किती सरसावले पुढे अनेक रूपांत,
तमा न बाळगूनी दिला त्यांनी मदतीचा हात.

काळरात्र आहे तरीही आशेच्या किरणांची झालर लावू,
दिव्यरसाच्या शोधातून शत्रूला या हरवू.

झुंजणार मी लढणार मी,
बंधनात राहुनी, विजयगीत गाणार मी,
उगवत्या सुर्यसाक्षीने,
श्वास मुक्त घेणार मी
श्वास मुक्त घेणार मी ।।

                   -- सौ अमिता जोशी

Divya Karanje

mam Your poem is really great. I will start to upload some marathi stories and poems on YouTube so...if you don't mind can I upload your poem on YouTube.