राणी तू भोळी

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, May 26, 2020, 05:49:21 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.राणी तू भोळी*

माझ्या संसाराची
तूच आहेस माडी
तुला पाहून जगतो
लावून लाडी गोडी

तुझ्या गं गालावर
प्रतिबिंब माझ्या ओठांचे
तू सावली माझी
तर नाव घेऊ कोणाचे

आज हसू पाहून तुझे
चंद्र लाजला लाजला
तुझ्या वेडा पाई गं
एक कवी हा गाजला

तुझ्या डोळ्यांची नक्षी
काळजावर स्वार होते
सागरी डोळ्यांची तू गं
दुःखाला जगण्या पार नेते

मी तुझा तवा होणार
तू माझी पुरण पोळी
किती प्रेम करतेस तू
अशी राणी तू भोळी

अशीच रहा सोबती तू
हा राघू देतोय आरोळी
करून घे तयारी तू ही
पूर्ण करण्या प्रेम चारोळी

फक्त तुझ्यासाठी

✍🏻(कविराज.अमोल मीरा दशरथ शिंदे)
मो.९६३७०४०९००.अहमदनगर