गवसणी

Started by Deeksha, May 28, 2020, 06:49:59 AM

Previous topic - Next topic

Deeksha

क्षितिजापलिकडील नभाला घालते गवसणी मी..
तोडुन सारे बंध अन पाश,मोकळा श्वास घेते मी..

बहरुनी त्या मोहरासारखे
वाटे बागडावे मोरासारखे
आशा त्या ह्रदयात दाबुनी
का जगावे आता मी..

धुंद त्या सरितेपरी
दिशा शोधावी एक नवी
स्वच्छंदी वाहता असे
अथांग सागरास मिळावे मी..

आसुसलेल्या त्या भावना
अन टाकुनी तो मैल मनाचा
जपण्यास अस्तित्व माझे
एक जन्म पुन्हा नवा घेते मी..