पुन्हा मरण वाट्याला आलं

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, May 29, 2020, 06:31:37 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.पुन्हा मरण वाट्याला आलं*

लॉकडाऊन झाल्या पासून
प्रेम होमकॉरंटाईन झालं
आणि आयुष्याच्या वाटेवर
पुन्हा मरण वाट्याला आलं

तुला समजून घेणं हे ही
शिकून घेतलं आहे रे मी
चंद्र लपून बसतो ना तसं
सारं मिटून घेतलं आहे रे मी

इतके दिवस समजून घेतलं
सारं तुला समजावं म्हणून
एकमेकांच्या या दुराव्याने
नव्यानं एकत्र यावं म्हणून

हळवं राहणं आता शिकलो
प्रेमाच्या वाटण्या झाल्यावर
गुलाब ही स्वस्त होतात गं
त्याच्या छाटण्या झाल्यावर

फक्त विश्वास जपणं हे
आता तुला सोपवलं होतं
विरहाचं घोंगवणार वार
आता तिथंच थोपावलं होतं

तुला जमणार नसेल तर
ते ही सांगून टाक एकदाचं
काळजावर जखमा आहेत
त्यांनाही साळून टाक एकदाचं

श्वासावर तुझे हक्क म्हणून
मरण ही तुला विचारून येईल
जमलंच तुला तर सांग त्याला
घेऊन गेल्यावर मी मुक्त होईल

✍🏻(कविराज.अमोल मीरा दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर