वंदितो बुद्धाला

Started by nareshKwankhade, May 29, 2020, 07:46:03 AM

Previous topic - Next topic

nareshKwankhade

   वंदितो बुद्धाला

सिद्धार्थ माझा सिद्धार्थ
संसार सोडुन गेला
राना-वनात निघुन
धनधान्य सोडुन गेला
सिद्धार्थ माझा सिद्धार्थ
संसार सोडुन गेला

दुख:चा मार्ग सोडुनी
सुखाची वाट शोधाया
शांतीची कास धरुनी
निघाला यशोधरेची साथ सोडाया
सिद्धार्थ माझा सिद्धार्थ
संसार सोडुन गेला

मरण या जगात म्हणे
चुकत नाही कुणाला
चल रे बाळा राहुल तु ही
संगत माझी धराया
चुंबन तुज घेऊन जातो मी
सत्याची जाण कराया
सिद्धार्थ माझा सिद्धार्थ
संसार सोडुन गेला

मनी भाव असला तरी
देव दिसत नाही म्हणे कुणा
मी ही देव नाही जणांनो
नका मज करु पुजा-अर्चना
सिद्धार्थ माझा सिद्धार्थ
संसार सोडुन गेला

सत्यवानी ती असीतमुनीची
नव्हती कुण्या लबाडबुवाची
नाही झाला सम्राट तर हा
म्हणे होईल बुद्ध मोठा
सिद्धार्थ माझा सिद्धार्थ
संसार सोडुन गेला

शिकवण या जगाला
शांतीची देवुन तयांनी
बुद्धाचा धम्मच तो म्हणे
दु:ख येते तृष्णेनी
ही वाटच सोडुनी
चला जावुया बुद्धाला वंदन कराया
सिद्धार्थ माझा सिद्धार्थ
संसार सोडुन गेला
--------***--------
नरेश कैलासराव वानखडे