भिशी

Started by Ira, May 29, 2020, 11:44:36 AM

Previous topic - Next topic

Ira


----भिशी---

जगण्यातील विरंगुळा
                 म्हणजे माझी भिशी,

खळखळणारी, बागडणारी
                  विहार मुक्त करणारी,
मैत्रीची नाती जपणारी,
                   अशी माझी भिशी.

भिशी म्हणजे श्रावणातील मृदगंध
           अन संगीतातील सप्तसुर,
भिशी म्हणजे पर्जन्यातील सरी
            अन समुद्रातील लहरी,

भिशी घेऊन येते हास्याचे धबधबे
            अन भावनांचे सागर.

कधी कधी ती रेंगाळते पदार्थांच्या
                     अवीट गोडीत तर,
कधी कधी ती रमते उनाड,   
            खट्याळ कोपरखळीत.                   

भिशीचे असणे हे हवेहवेसे वाटते तर,
भिशीचे नसणे चटका लावून जाते.

भिशी कधी, कुठे यावर चर्चा बऱ्याच रंगतात,
पण भेटायचे ठरले की सख्या
हिंदोळ्यावर झुलतात.

अर्थार्जन करणे हे भिशीचे केवळ निमित्त असते,
वेळ काढून गप्पांची मैफल रंगवण्याचे निखळ ते कारण असते.

मैत्रीतील ओलावा जपणारी अशी ही भिशी,
प्रत्येकाने तरी अनुभवायलाच हवी,
वेळ काढून स्वतःसाठी आठवणींची शिदोरी ठेवायलाच हवी,
क्षणभंगुर या आयुष्यात
एक तरी भिशी असायलाच हवी।
एक तरी भिशी असायलाच हवी।।

----अमिता----