आनंदाचे दिवस पुन्हा येऊदे बाप्पा

Started by Shilpa Mohite, May 29, 2020, 07:41:56 PM

Previous topic - Next topic

Shilpa Mohite

पुष्प ९ वे
           आनंदाचे दिवस पुन्हा येऊदे बाप्पा

एकदा मुले होती अंगणात खेळत
आईकडे आली पळत-पळत

ए आई, कशाला हवी रोज रोज शाळा
शाळेत जायचा आम्हाला आलाय कंटाळा

आई म्हणाली मुलांना का करताय दंगा
शाळा नको तुम्हाला तर देवबाप्पाला सांगा

धावत-धावत मुले गेली देवबाप्पाकडे
देवबाप्पाला त्यांनी घातले साकडे

कोरोनामुळे शाळा झाल्या बंद
मुलांनाही झाला आनंदी -आनंद

टी.व्ही.पाहू लागली घरामध्ये बसून
मजा करु लागली बैठे खेळ खेळून

आवडीचे छंद जोपासले त्यांनी मस्त
पण भेटेनात कुणी आवडते दोस्त

तेच  तेच करून आता आला कंटाळा
वाटू लागले त्यांना कधी उघडणार शाळा

पुन्हा गेली बाप्पाकडे विनवणी लागली करू
तक्रार पुन्हा करणार नाही शाळा करा सुरू

कोरोनाचे संकट दूर करा आता
आनंदाचे दिवस पुन्हा येऊदे बाप्पा
     
              -शिल्पा मोहिते