पोट भरणारा देव

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, May 30, 2020, 09:34:43 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.पोट भरणारा देव*

कसं सांगू या संसाराच्या
बुडाखाली अंधार झाला
काल पुन्हा कर्ज देणारा
पैसे देऊन सावकार झाला

सवयचं लागली आहे
सारं सारं सहनं करायची
व्याजावर व्याज चढवलं जातं
मग वेळ येते विष घेण्याची

असच चालत राहणार
जोपर्यंत सवय मोडतं नाही
हे मात्र नक्की त्यांच्या डायरीतलं
आपलं नाव कधीचं खोडतं नाही

रक्ताने रंगवले जातील
सातबारे त्यांच्या तिजोरीतले
कारण त्यांच्या व्याजाची फेड
करून घेतात गावगुंड मुजोरीतले

कधी कधी येणार पाटाचं पाणी
गेलं जरी आमच्या वावरा जवळून
नाव राहतं आमच पण टिपूस ही
दिला जातं नाही जरी पीक गेलं जळून

सरकार लवकर जागा हो रे
आता पोट भरणाराचं उपाशी राहतोय
देशात हिरवाईने नटलेला प्रत्येक गाव
सावकारी भस्मासुराच्या जाळ्यात जातोय

याला लवकर रोखलं नाही तर
गावात फक्त सावकार जिवंत राहिलं
मग शेवटी सगळे उपाशी राहतील
अन पोट भरणारा देव मात्र अमर होईलं

✍🏻(कविराज.अमोल मीरा दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर