बाप

Started by divyawagh555, May 30, 2020, 01:26:05 PM

Previous topic - Next topic

divyawagh555

आज‌ सहज मनात विचार आला....
एवढं सोपं असतं का हो बाप होणं???
मनातील भाव तोंडावर‌ दिसू‌ न देणं
डोळ्यातील पाणी खाली पडू न देणं
मुलांच्या शिक्षणासाठीचे कर्ज आयुष्यभर फेडतं बसणं
सुखासाठी त्यांच्या अहोरात्र ते कष्ट करणं
एवढं सोपं असतं का हो बाप होणं???
जीवनाचे धडे मुलांना अनुभवातून‌ शिकवणं
पाठीशी त्यांच्या डोंगरासारखं उभं राहणं
कधी दुकानातूनं‌ एक वडापाव कमी‌ आणणं,
का तर म्हणे मी खाऊन आलो,खरं असेल का हो‌ त्याचं हे सांगणं
एवढं सोपं असतं का हो बाप होणं???
एवढीश्या पगारातून मुलीला लॅपटॉप अन् मुलाला पल्सर घेणं
वीस वर्षापूर्वीच्या सीडी100 वरती जिवापाडं प्रेम‌ करणं
कामावरती  जाताना बील भरणं अन येताना भाजी आणणं
न चुकता मुलांना महीन्याला पैसे पाठवणं
एवढं सोपं असतं का हो बाप होणं???
काही वेळा स्वताच्या बापाचाही बापं होणं
वृद्धापणी त्याच्या त्याला‌ मुलाप्रमाने जपणं
विसरत चाललेल्या स्मरणशक्तीला हो ला हो म्हणणं
मनावरती दगड‌ ठेउन‌ बापाच्या चितेला‌ अग्नी देणं
एवढं सोपं असतं का हो बाप होणं???

दिव्या वाघ.

nareshKwankhade