नातं

Started by Deeksha, May 30, 2020, 05:45:08 PM

Previous topic - Next topic

Deeksha

नातं कुठलंही असुदेत, काहीच नसतं ते विश्वासाविना
नाहीतर गुदमरतं ते नातं,श्वासाविना..

ओझं नसतं ते कधीच
आधार असतं ते आयुष्याचा
जसं..मासा तळमळतो..पाण्याविना...
तसचं नातं कुठलंही असुदेत,काहीच नसतं ते विश्वासाविना..

जवळचं आणी दुरचं,असं काहीच नसतं
प्रत्येक वाईट-चांगल्या वेळेत,साथ मात्र ते देत असतं
जसं..जगणं शुन्य असतं..उमेदीविना...
तसच..नातं कुठलंही असुदेत,काहीच नसतं ते विश्वासाविना..