काय भेटले

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, May 31, 2020, 10:26:14 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.काय भेटले*

काय भेटले वेड्या असे
आजवर प्रेम करून तुला
अशा स्मशानात शांततेतं
असं कायमचं मरून तुला

तिला बोलायच नसेल तर
असं उगाच बोलत असतो
आरशांचा खून करून मग
असं चामडी सोलत बसतो

कारण दोष त्याचा होता
त्यानं चुकीचं घडवलं होतं
काटेरी गालिच्याला असं
माखमलाने मढवलं होतं

तयारी कर तू अगणित
मरण यातना सोसायला
दुर्लक्ष केलं तिनं तुझं प्रेम
सुरुवात कर दुःख पोसायला

अशी कठोर काळजाची ती
प्रेमाचे वर वर पाढे गिरवायची
दाखवण्या या जगाला खोट्या
गणिती सूत्राला घेऊन मिरवायची

तिला न ओळखताचं तू
अंदाज बांधण्या चुकतं गेला
क्षणिक सुख होते जवळ तुझ्या
त्याला ही नकळत मुकतं गेला

✍🏻(कविराज.अमोल मीरा दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

जगताप अक्षय

खूप मस्त सादर केलय !