चंदनाचा टिळा विठू कापाळीला लावला

Started by sdsarabi, June 02, 2020, 10:05:31 PM

Previous topic - Next topic

sdsarabi

चंदनाचा टिळा विठू कापाळीला लावला I भोळ्या माझ्या विठूबाने रूप मज दवला II
माझ्या कडे पाहून विठू चंद्रावणी हसला I अंधारल्या नभांमध्ये नक्षत्रच भासला II
केलि नाही त्यानं कधी कुणाची भी परवा I त्याच्या गळी शोभियतो तुळसीहार हिरवा II
कानी आहे कुंडल त्याच्या कडेवर कर I विठू माझा भक्तासाठी उभा विठेवर II
चंदनाचा टिळा विठू कापाळीला लावला I भोळ्या माझ्या विठूबाने रूप मज दवला II
गेली सखी रागावून परी नाही हलला I भक्तासाठी पंढरीची वारी पाई चालला II
दिले त्याने ज्ञानोबाला ज्ञान ते अपार I लिहुनिया ज्ञानेश्वरी फेडिले उपकार II
धन्य झाले ज्ञानोबा जगी जय जय कार I विठोबाच्या भक्तीचा महिमा अपार II
चंदनाचा टिळा विठू कापाळीला लावला I भोळ्या माझ्या विठूबाने रूप मज दवला II
दंगोनिया भक्ती मध्ये नाचतो कुंभार I घडवितो मडके त्याच्या गळा विठू हार II
दंग झाले भजनात नसे कोणताही भास I पाहुनिया विठू मुख मुखावर सदा हIस II
चंदनाचा टिळा विठू कापाळीला लावला I भोळ्या माझ्या विठूबाने रूप मज दवला II
तुका छेडे एकतारी झाला विठू तल्लीन I अभंगाच्या गाथेपाई झाला तुका दीन II
बुडालेली गाथा त्याची आलीया तरून  I अपार त्या भक्ती पुढे सर्व आहे क्षीण II
चंदनाचा टिळा विठू कापाळीला लावला I भोळ्या माझ्या विठूबाने रूप मज दवला II
केली किरपा आम्हावरी घडवी संसार I नित्य करिन देवा तुजला मुजरा त्रिवार II
घालोनिया दंडवत मागतो  मी क्षमा I मोडलेल्या मणक्याचा तूच आहे कणा II
चंदनाचा टिळा विठू कापाळीला लावला I भोळ्या माझ्या विठूबाने रूप मज दवला II

SANJIVANI