बस! झालं आता कोरोना

Started by sdsarabi, June 04, 2020, 10:04:11 PM

Previous topic - Next topic

sdsarabi

बस! झालं आता कोरोना
एवढा कहर  बरा नाय........
शांत  झाली  धरणी माय
शांत झाल्या  दाही  दिशा
नाही  काम नाही धंदा
जगण्याचा  पण केलास वांदा
मुकी केली धरणी माय

बस! झालं आता कोरोना
एवढा कहर  बरा नाय.......
तांडेच्या तांडे निघून  गेले हाय
कुणी आना  विना  मेले हाय
तान्ह लेकरू रडतं हाय 
चालता चालता पडतं हाय 

बस! झालं आता कोरोना
एवढा कहर  बरा नाय........
डॉक्टर माझा लढतो हाय 
पोलीस पाया पडतो हाय
धरणीच्या  रक्षणासाठी 
भूमी पूत्र हा झटतो हाय

बस! झालं आता कोरोना
एवढा कहर  बरा नाय........
चक्र सारं थांबल हाय
उभ्या जन्मात:  घडलं नाही ते घडलं हाय 
प्रत्येकाचं  एक  पाऊल मागं  पडलं हाय
बस! झालं आता कोरोना
एवढा कहर  बरा नाय........ 


Sanjivani Sarabi