माझं काय चुकल?

Started by smadye, June 05, 2020, 01:38:18 AM

Previous topic - Next topic

smadye

माझं काय चुकल?

पोटुशी मी हत्तीण
भूक लागली म्हणून कळवळली
मानव दयावान तू
म्हणून तुझ्याकडे धाव घेतली

अन्नासाठी आर्जव मी तुला केला
पोटातल्या जीवासाठी नाईलाज माझा झाला
सोंडेने करुनि नमन, विनंती मी केली
फळ अननसाचे पाहून मनी मी संतोषली

मिळाले अन्न खुश मी जाहले
मनापसून धन्यवाद मी तुला दिले
एक क्षण झाला अन  , तोंड अग्निदाह झाले
मलाच कळेना काय झाले, माझे तोंड फुटू लागले

सैरावैर मी झाले , पाणी शोधत निघाले
बाळाला न व्हावी इजा , म्हणून मी तडफ़डले
तरीही न केली कोणा इजा, ना नासधूस केली
धावत तळ्याचा  काठ गाठीला,  जल उडी घेतली

विचार करत तोंड खुपसले पाण्यात
कळेना मजला का झाला माझा आत्मघात?
भुकेसाठी ओंजळ पसरली,
मग मरण का ओंजळीत आले?

मरता मरता विचार केला
मानव असा का झाला,
विश्वास ठेविला म्हणुनी का
माझा विश्वासघात तू केला

गजराज पूजिता तुम्ही मनोभावे
मग गजाची का हि अवहेलना?
प्राण जाईपर्यंत
का दिली हि यातना?

बाळासंगे त्यागीते प्राण
कसे त्याला मागे ठेवू?
माझी हि गत झाली ,
कोणावर भरवसा ठेवू?

आम्ही जनावरेहि न देत कोणाला त्रास
मृदू मनाच्या मानवा , मग का केलास माझा घात?
एकच प्रश्न मनी माझ्या, काय माझं चुकलं?
अन्नाऐवजी तू मला मरणदान का दिलस ?
 
सौ सुप्रिया समीर मडये