जगणे या जींदगीचे.

Started by nareshKwankhade, June 05, 2020, 07:23:59 AM

Previous topic - Next topic

nareshKwankhade

 जगणे या जींदगीचे.

दिवस हे धकत गेले
पण अंधार संपला नाही
श्रुंगार हा माझ्या जगण्यावरती
आजही चढला नाही
कधी मिळेल मजला
माझ्या ह्द्याचा हा साज
मुकुट येईल डोईवरती
मग होईल हा गाजावाज

गीत जरी गाईले मी
हररोज या जिंदगीचे
पण पडलो विरहाने असा
कि आजही सावरलो नाही

गावे म्हटले गाणे
या दगाबाज काळाचे
हातात घडी आहे
मात्र वेळेचेच भान नाही


या एकटेपणाने माझ्या
कळस गाठला जणु आज
दिवस मावळत गेले
मात्र रात्रच निजली नाही

अशी तुफ़ान वाट ही
जणु अंधारलेली रात आहे
काहीच कळेना मजला
"कोरोना"ही विषाणुची
कोणती निच जात आहे.
--------***--------
          नरेश