तू स्वामिनी सर्वशक्तिची

Started by Shubhangi Gaikwad, June 05, 2020, 08:04:22 AM

Previous topic - Next topic

Shubhangi Gaikwad

तोड न ज्याला असे धैर्य तयेचे
अमर अखंडित तेजोमय गाथा
दिपवूनी टाकती शौर्य तयेचे
अभिमानाने झुकतो माथा

दया पाझरे तव अंतःकरणी
तू विद्येची तू शक्तीची स्वामिनी

धावुनी आली भक्तांच्या मदतील
सिंहावरी आरूढ होऊनी
संहार केला दुष्ट महिषासूराचा
तू दुर्गा महिषासूरमर्दिनी

हिंदूत्वाच बीज हूंकारले गर्भात
ती माय जिजाऊ शिवबाची
करूनी शिवबाला सर्वज्ञानी
केली स्वराज्याची उभारणी

झुंजली मातृभूच्या रक्षणासाठी
तळपली समशेर रणांगणी
दिला एक एक थेंब रक्ताचा
तू राणी लक्ष्मीबाई रणरागीनी

झेलूनी शेणाचे गोळे केलेस साक्षर
तू ज्योतिबांची सावित्री
स्त्री अज्ञानाच केलेस निर्मूलन
स्त्रीशिक्षणाची ज्योत तेवत ठेवूनी

देशावरल्या कित्येक संकटांना
गेली सामोरी तटस्थ राहूनी
झाली पहिली स्त्री पंतप्रधान
तू इंदिरा तू प्रियदर्शनी

अभिमानाने फुलते देशाची छाती
तू कल्पना, अंतराळ विरांगनी
बांधले अवकाशाशी नाते
घालूनी आकाशाला गवसणी

तू रमा अहिल्या दुर्गा सिंधू  तूच आनंदी
अनेक रूपांनी आणला इतिहास घडवूनी
नारी तू सबला,साद घाली त्यांची हाक 
हो निशंक तू,जाआत्मविश्वासाने बहरूनी

दया पाझरे तव अंतःकरणी
तू विद्येची तू शक्तीची स्वामीनी

शुभांगी सुभाष