बेभान वादळ

Started by Prashant Jain, June 07, 2020, 03:58:59 PM

Previous topic - Next topic

Prashant Jain

बेभान वादळ

सोसाट्याचा वारा
पावसाचा मारा.....
उडवीत धावपळ
आले वादळ.....

लाटा उसळती
झाडे कोसळती.....
पशुपक्ष्यांचे हाल
समुद्र बेताल.....

निसर्गाचा थयथयाट
मृत्यूचा घाट.....
जन्माचे कष्ट
क्षणात नष्ट.....

घरे पडली
मने रडली.....
मोडले संसार
दुःख अपार.....

वादळ शांत
पसरला एकांत.....
मदतीचे हाथ
अनेकांची साथ....

ठेऊन धैर्य
राखण्या स्थैर्य.....
रचावा पाया
जीवन जगाया.....

उभे राहून
पोराबाळांकडे पाहून.....
गावे जीवनगाणें
बेभान वादळाप्रमाणे.....


-प्रशांत जैन
अंधेरी, मुंबई
M-9321931008