पाणी

Started by Prashant Jain, June 08, 2020, 03:14:44 PM

Previous topic - Next topic

Prashant Jain

      पाणी 

ऊन भयाण भयाण
घोटभर पाण्यासाठी
काकुळतीला आले प्रांण.       

हंडाभर पाण्यासाठी
करावी लागते मैलोंमैल पायपीट.
पाणी म्हणजे जीवन
विनापाणी जगण्याचा आला वीट.

पिण्यासाठी नाहीं पाणी
शेतीला कुठून द्यावं.
खोल विहिरीत उतरून
घोटभर पाणी घ्यावं.

पाऊस नाहीं पडला
कोरडे पडले शिवार.
माणसांना मिळंना पाणी
तहानेनं आसुसले जणांवर.

कृपा कर भगवंता
दे पावसाच दान.
शेतात राबणाऱ्या बळीराजा
गाउदे सुखाचं गाणं.

-प्रशांत जैन,
शेवगांव,  अहमदनगर
M- 9321931008

(ही कविता मराठवाड्यातील पाण्यासाठी दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी समर्पित)