शाळेचा पहिला दिवस

Started by Prashant Jain, June 09, 2020, 04:30:57 PM

Previous topic - Next topic

Prashant Jain

 शाळेचा पहिला दिवस


सकाळी लवकर उठून
मायमाउलीने बनवला खाऊ गोड.....
नवीन गणवेश आणला बाबांनी
त्याला नव्या दप्तराची जोड.....

शाळेचा पहिला दिवस
बाबा म्हणती आवर लवकर.....
हाथ धरून बाबाचां
शाळेची वाट सरली भरभर.....

ज्ञानमंदिराची ओलांडली पायरी
सोडून बाबाचां मायेचा हाथ.....
नवीन सखेसोबती भेटले
आता वर्षभर त्यांचीच साथ......

जीवनाच्या प्रवासात
शाळा असते दुसरे घर.....
चांगल्याची शिकवण तेथे भेटते
बनवण्या जीवन सुखकर.....

प्रत्येकासाठी आठवणींचा असतो
शाळेचा पहिला दिवस.....
मायबापाची सोडून माया
सुरु होतो जीवनाचा प्रवास......


-प्रशांत जैन
शेवगांव, अहमदनगर, 
M- 9321931008